Navratri  Fair

मुर्ती स्थापण करते वेळी तीन दिवसांचा सप्ताहा आयोजित करण्यात येऊन श्री साखरे महाराज यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व तेव्हापासून दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सवात दरवर्षी वेगवेगळे ऊपक्रम राबवण्यात येतात. यात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, असे उपक्रम करण्यात येतात तसेच दोन वर्षानपासून महिला किर्तनकार सप्ताह आयोजित करण्यात येत आहे .

श्री सटुआई मंदिराची ख्याती ऐकून जेसिका मॅडम ( दक्षिण फ्रान्स ) यांनी देवीवर आधारित इतिहासावर आभ्यास करण्यासाठी दोन वेळेस डुबेरे येथे येऊन पूर्ण नवरात्र कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे.