About Satwai Devi

महाराष्ट्रात असलेल्या श्री सटुआई शक्तिपीठानपैकी डुबेरे येथील श्री सटुआई जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या जागृत देवस्थानाविषयी सर्वांना माहिती मिळवी म्हणून हा पंक्तप्रपंच…

श्री क्षेत्र डुबेरे येथे साधारण ३०० वर्षापासून हे मंदिर स्थापण झालेले आहे. मंदिर जुन्या पध्दतीचे माडीचे दगड विटा मातीचे घर होते. मातृत्व हा स्त्रीच्या जिवनातील महत्वाचा प्रसंग, हिंन्दू धर्मातील रितीरिवाजा प्रमाणे अनेक संस्कार व धार्मिक विधी केले जातात. मूल जन्माला आले की सटुआई त्याच्या कपाळी प्रारब्ध ( भाग्यरेषा ) लिहीते असा समज हिंन्दू धर्मांमध्ये रूढ आहे. त्यामुळे सटुआई ऊर्फ सटी या देवतेला बाळ बाळंतीनीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. डुबेरे येथील प्राचीन सटुआई मंदिर गावाच्या नावलौकिकास भर टाकणारे आहे. पूर्वीपासून आजपर्यंत लहान मुलांचे जावळ काढणे, मूल होत नसल्यास नवस बोलणे, लहान बालकांची ईडापिडा ( आजार ) जाण्यासाठी देविला साकडे घातले जाते. या देविच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, मध्येप्रदेश, कर्नाटक तसेच परदेशी भाविक अमेरीका, फ्रान्स व जर्मनी ई देशातून श्रध्देने येतात. "सटीचा लेखा जोखा न चुके ब्रम्हादिका" असे म्हटले जाणार्‍या या देवीच्या मंदिरात शेंदूर लावलेल्या दोन पाषाणमूर्ती ( तांदळे ) आहेत बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी त्याच्या कपाळावर त्याचे ( नशिब ) प्रारब्ध लिहिनारी देवता म्हणजे सटुआई व बाळाच्या आरोग्याची काळजी घेणारी देवता म्हणजे जिवनी. मात्र सटुआई व जिवनी या दोन बहिणींचे आपसात कधीच पटत नसल्यामुळे त्यांचे भाविक सुध्दा परस्परविरोधी देवतांना जात नाही. नवस फेडण्यासाठी येणारे भाविक देविला खेळणा पाळणा नाडापुडी आर्पण करतात. पूजा करतांना बाळाची आई देविची वाट आपल्या केसांनी झाडते. पाच वेळा देविला दंडवत घालते. जावळाचे केस काढतांना प्रथम मान मामांना असतो व आत्या ते जावळ आपल्या ओटीत झेलते. बरेच जन येथे शिदा आणून शिजवतात व देविला नैवैद्य अर्पण करतात. देविला गोड नैवैद्य ( शाकाहारी ) असतो मात्र देविचा सारथी असलेल्या काळोबाला खास ( मांसाहारी ) नैवैद्य दाखवला जातो. काळोबाचे मंदिर देवी मंदिराच्या मुख्य दरवाजा शेजारी आहे. भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे विधी ( जत्रा ) करतात. देविचा नवस फेडण्यासाठी आलेले भक्त दर्शनानंतर गावात कोणाकडेही न जाता सरळ आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात व घरी गेल्यावर आंघोळ करतात. असी प्रथा आहे.

सन १९८७ साली गावातील तरून कार्यकर्ते श्री नारायण केरूजी वाजे यांच्या पुढाकाराणे श्री सटुआई मंदिर ट्रस्ट स्थापण झाले असून १९९५ साली जुनाट मंदिर पाडून सन १९९७ साली अद्यावत मंदिराचे भूमिपुजन श्री त्र्यंबक बाबा भगत ( सिन्नर ) यांचे हस्ते होऊन मंदिर गर्भगृह बांधण्यात आले. गृर्भ गृहात काल्पणिक परंतु अप्रतिम आशी पंचधातुनची मुर्ती श्री शरद मैद ( नाशिक ) यांच्या कडून बनवून घेतली. मुर्तीसाठी १ लाख १ हजार व कळसासाठी २९००० हजार तसेच १५००० रूपये खर्चुन देवघर बनविण्यात आले. मुर्तीची संकल्पना चित्र श्री भिमाजी चव्हाण यांनी तयार केलेले आहे. दिनांक ८ एप्रिल २००२ रोजी श्री सटुआई देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन समारंभ, होम, हवन, वैदिक मंत्र घोषात नाशिक येथील ब्रम्हवृंदाच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षिणे संपन्न झाला. महामंडलेश्वर आचार्य महंत ह. भ. प. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पूर्ण झाला. भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास बांधण्यात आले. तसेच ग्रामिण विकास योजने अंतर्गत सभामंडप, स्वच्छता गृह, संरक्षण भिंत व पाण्याची टाकी ह्या सुविधा तयार आहेत.

मुर्ती स्थापण करते वेळी तीन दिवसांचा सप्ताहा आयोजित करण्यात येऊन श्री साखरे महाराज यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. व तेव्हापासून दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सवात दरवर्षी वेगवेगळे ऊपक्रम राबवण्यात येतात. यात रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, असे उपक्रम करण्यात येतात तसेच दोन वर्षापासून महिला किर्तनकार सप्ताह आयोजित करण्यात येत आहे .

श्री सटुआई मंदिराची ख्याती ऐकून जेसिका मॅडम ( दक्षिण फ्रान्स ) यांनी देवीवर आधारित इतिहासावर आभ्यास करण्यासाठी दोन वेळेस डुबेरे येथे येऊन पूर्ण नवरात्र कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे.