About Satwai Devi

श्री नारायण केरूजी वाजे
(संस्थापक)

श्री भिमाजी चव्हाण
(सचिव)

सन १९८७ साली गावातील तरून कार्यकर्ते श्री नारायण केरूजी वाजे यांच्या पुढाकाराणे श्री सटुआई मंदिर ट्रस्ट स्थापण झाले असून १९९५ साली जुनाट मंदिर पाडून सन १९९७ साली अद्यावत मंदिराचे भूमिपुजन श्री त्र्यंबक बाबा भगत ( सिन्नर ) यांचे हस्ते होऊन मंदिर गर्भगृह बांधण्यात आले.

गर्भ गृहात काल्पणिक परंतु अप्रतिम अशी पंचधातुची मुर्ती श्री शरद मैद ( नाशिक ) यांच्या कडून बनवून घेतली. मुर्तीसाठी १ लाख १ हजार व कळसासाठी २९००० हजार तसेच १५००० रूपये खर्चुन देवघर बनविण्यात आले.

मुर्तीची संकल्पना चित्र श्री भिमाजी चव्हाण यांनी तयार केलेले आहे. दिनांक ८ एप्रिल २००२ रोजी श्री सटुआई देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ, होम, हवन, वैदिक मंत्र घोषात नाशिक येथील ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षिणे संपन्न झाला. महामंडलेश्वर आचार्य महंत ह. भ. प. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पूर्ण झाला.

भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास बांधण्यात आले. तसेच ग्रामिण विकास योजने अंतर्गत सभामंडप, स्वच्छता गृह, संरक्षण भिंत व पाण्याची टाकी ह्या सुविधा तयार आहेत.